sanjay raut-amit shah

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की,दिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाही, देशात विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही नाही, आणि लोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेल. भाजपाने पुडुचेरीसारखे छोटे राज्यसुद्धा काँग्रेसकडून खेचून घेतलं, आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भाजपा पुढाऱ्यांनी जाहीर केलंय

    मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये, जे पेराल तेच उगवेल याचं भान ठेवावं असा गंभीर इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. पुडुचेरीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला, याठिकाणी पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं, त्यानंतर पुडुचेरीमधील काँग्रेस सरकार कोसळलं, मात्र या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार का? अशी चर्चा सुरु आहे, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना ठणकावलं.

    शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की,दिल्लीत जे लोक बसले आहेत, ते सत्ता आणि पैशाचा जो गैरवापर करत आहेत ते देशासाठी योग्य नाही, देशात विरोधी पक्ष नसेल तर लोकशाही नाही, आणि लोकशाही नसेल तर देश नसेल आणि देश नसला तर देशी ईस्ट इंडिया कंपनी बनेल. भाजपाने पुडुचेरीसारखे छोटे राज्यसुद्धा काँग्रेसकडून खेचून घेतलं, आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भाजपा पुढाऱ्यांनी जाहीर केलंय, मात्र भाजपने लक्षात घ्यावे की, महाराष्ट्र आणि पुडुचेरीमध्ये फरक आहे, याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, येथे शिवसेनाघटक पक्षांनासोबत महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहे, महाराष्ट्रात शिवसेना आहे, त्यामुळे नुसती उठाठेव करू नये असं त्यांनी बजावलं आहे,