राणें विरोधात शिवसेनेची रणनिती तयार, युवासेना उतरली रस्त्यावर, सेना भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने

युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या बंगल्याखाली जमले असून भाजप व सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. “आम्ही वाट बघतोय” अशा पध्दतीचं ट्वीट राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी केलं होतं.

    “मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं हे वक्तव्य आता त्यांच्याच अंगाशी येण्याची शक्यता आहे. रायगडमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणेंची जीभ घसरली आणि राज्यात राणे विरुध्द शिवसेना असा संघर्ष सुरु झाला आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना अडकवण्यासाठी शिवसेनेने रणनिती तयार केली असून युवा सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून नारायण यांच्या जुहू येथील बंगल्यासमोर सेना भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

    युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे यांच्या बंगल्याखाली जमले असून भाजप व सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. “आम्ही वाट बघतोय” अशा पध्दतीचं ट्वीट राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी केलं होतं.

    याच वादातून शिवसेना भाजपचे कार्यकर्ते मुंबईतील जुहूमध्ये समोरासमोर आले आणि जोरदार राडा झाला. याच दरम्यान, भाजपच्या कार्यत्यांनी दगडफेक केल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. भाजपा-शिवसेनेच्या या दगडफेकीत पोलीस जखमी झाले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.

    त्यामुळे आता हा वाद कधी शांत होतो हे पाहाण महत्वाचं ठरणार आहे.