शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन बँकेचा परवाना रद्द

बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांच्या हितासाठी सहकारी बँकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आरबीआयने लातूर जिल्ह्यातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँके (निलंगा) बँकिंग परवाना रद्द केला आहे.

    मुंबई : बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांच्या हितासाठी सहकारी बँकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आरबीआयने लातूर जिल्ह्यातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँके (निलंगा) बँकिंग परवाना रद्द केला आहे.

    बँकेकडे पुरेसे नसलेले भांडवल आणि भविष्यातून उत्पन्न मिळविण्याची कमी संधी या कारणाने निलंगेकर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. ठेवीदारांना पूर्ण पैसे देण्याएवढी या बँकेची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे बँकिंग परवाना रद्द केल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

    या कारवाईमुळे बँकेला कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. बँकेचा व्यवसाय बुधवारपासून बंद होणार आहे. महाराष्ट्राचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक यांना पुढील कारवाई करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत.