बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, 30 पेक्षा अधिक जागा जिंकू; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. दरम्यान यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.

    मुंबई : बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षानंतर आज मतदान होत आहे. दरम्यान यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.

    संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

    कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसं उत्साही वातावरण दिसतंय. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे. हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असं संजय राऊत म्हणाले.

    महानगर पालिका द्वेषबुद्धीने बरखास्त

    कर्नाटक सरकारचा कार्यकर्त्यांवर दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचं ठरवलं आहे. असं राऊत म्हमाले. तसेचं या वेळेला बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षाने होत आहे. बहुमतामध्ये सत्ता असलेली महानगर पालिका द्वेषबुद्धीने बरखास्त करण्यात आली होती. भगवा झेंडा उतरवण्यात आला होता. अशी अनेक कृत्ये कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली होती, अशी टीका त्यांनी केली.

    बेळगाव मध्ये मतदानाला सुरुवात

    बेळगाव महापालिकेच्या एकूण 58 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीत एकूण 375 उमेदवार रिंगणात आहे. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार असून मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी बेळगावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेजारच्या बागलकोट जिल्ह्यातून अतरिक्त कुमक मागवण्यात आली होती. राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या, गृहरक्षक दलाचे 300 जवान आणि बागलकोट तालुक्यातील पोलीस जवान याठिकाणी तैनात आहेत. शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांसह बहुतेक ठिकाणी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले होते.

    बेळगावसह हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी या महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. आता 6 सप्टेंबरला बेळगाव महानगरपालिकेचा निकाल जाहीर होईल.