Breaking : कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांचे निधन

चेंबूर येथील अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्डा, घाटलागाव येथे निवासस्थानी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. महाडिक यांच्या निधनाने भारतीय कामगार सेनेचा दीपस्तंभ हरपल्याची भावना भारतीय कामगार सेनेतून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई : भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत महाडिक यांचे आज रात्री साडे आठ वाजता अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. चेंबूर येथील अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्डा, घाटलागाव येथे निवासस्थानी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. महाडिक यांच्या निधनाने भारतीय कामगार सेनेचा दीपस्तंभ हरपल्याची भावना भारतीय कामगार सेनेतून व्यक्त करण्यात येत आहे.