Many big leaders including Anant Gite and Ramdas Kadam have no entry in this year's Dussehra festival; Only 1300 Shiv Sainiks are admitted

शिवतीर्थावरील दसरा मेळावा(Shivsena Dasara Melava 2021) यंदा देखील निवडक नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला असून कोरोनाच्या निर्बंधामुळे शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात घ्यावा लागत आहे. षण्मुखानंद सभागृहाची २६००ची क्षमता आहे. त्याच्या ५० टक्केच शिवसैनिक उपस्थित राहतील.  

    मुंबई : शिवतीर्थावरील दसरा मेळावा(Shivsena Dasara Melava 2021) यंदा देखील निवडक नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला असून कोरोनाच्या निर्बंधामुळे शिवाजी पार्क ऐवजी षण्मुखानंद सभागृहात घ्यावा लागत आहे. षण्मुखानंद सभागृहाची २६००ची क्षमता आहे. त्याच्या ५० टक्केच शिवसैनिक उपस्थित राहतील.

    यासाठी ठाण्यापर्यंतच्याच शिवसेना नेते, लोकप्रतिनिधीना, पदाधिका-यांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती खाअनिल देसाई यांनी माध्यमांना दिली आहे. त्यामुळे या मेळाव्याला माजी खासदार अनंत गिते आणि शिवसेना नेते रामदास कदम यांची उपस्थिती नसेल हे स्पष्ट झाले आहे.

    खा. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साडेसात ते आठच्या सुमारास बोलतील. येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. तसेच राजकीय घडामोडीचा समाचारही उद्धव ठाकरे घेतील. या शिवाय मुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारच्या कामाचा आढावाही घेण्याची शक्यता आहे. खा देसाई म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. येत्या काळात राज्याची रूपरेखा कशी असेल त्यावर ते बोलण्याची शक्यता आहे.