शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला रामदास कदमांना नो एंट्री ?

माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला असून या वादावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असून, रामदास भाईंवर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती .

    शिवसेनेच्या या वर्षीच्या दसरा मेळाव्यात सामान्य शिवसैनिकांना उपस्थित राहता येणार नाही. त्यात शिवसेना वरिष्ठ नेते रामदास कदम दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार का नाही याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं कळतंय. त्यामुळेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांना एन्ट्री नसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नाही तर रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

    माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला असून या वादावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असून, रामदास भाईंवर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती . त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करून रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजत होते. मात्र यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यात आता दसरा मेळावा आहे. यावेळी रामदास कदम यांना बोलावलं नसेल अशी देखील चर्चा सुरु आहे.

    काही दिवसांपुर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. मात्र, त्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्याच एका नेत्यानं रसद पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसा गंभीर आरोप केलाय. खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचं नाव घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.