sanjay-nirupam

शिवसेना(shivsena) बदललेली नाही. आजही ती गुंड पार्टीच आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते(congresas leader) संजय निरुपम(sanjay nirupam) यांनी केली आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्यानंतर ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस कधीपर्यंत शिवसेनेचे ओझे(burden of shivsena) सहन करणार, असा प्रश्न निरुपम यांनी विचारला आहे.

अधिकाऱ्याला होणारी मारहाण ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी आहे. राज्य सरकार आणि पोलिसांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अभय दिले जात आहे. ही बाब खूप धोकादायक आहे. शिवसेनेचे पितळ आता उघडं पडत आहे. शिवसेना गुंडा पार्टी आहे. आजही या पार्टीचा गुंडगिरी करण्यावर विश्वास आहे, हे स्पष्ट दिसले आहे, असे निरुपम म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना शिवसेनेसोबत सत्तेत बसण्यात धन्यता वाटत आहे. शिवसेनेचे ओझे काँग्रेस कधीपर्यंत सहन करणार हे त्यांना विचारायला पाहिजे.निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी ६ जणांना अटक केली. यात शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्ता आहे. कांदिवलीमध्ये ही मारहाण करण्यात आली.