भातखळकरांचे डोके ठिकाणावर नाही, शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदेंनी साधला निशाणा

भातखळकरांच्या आक्षेपावर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे(Manisha Kayande Comment About Atul Bhatkhalkar) यांनी जोरदार टिका केली. भातखळकर यांचे डोके ठिकाणावर नाही, असे कायंदे म्हणाल्या.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thakre) यांनी महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यावर अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. भातखळकरांच्या आक्षेपावर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे(Manisha Kayande Comment About Atul Bhatkhalkar) यांनी जोरदार टिका केली. भातखळकर यांचे डोके ठिकाणावर नाही, असे कायंदे म्हणाल्या. पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात मुख्यमंत्री काय चुकीचे बोलले? असा सवाल त्यांनी केला.

    कामगारांच्या योजनांसाठी केंद्राच्याही नोंदी ठेवण्याच्या सूचना
    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली असल्याचे कायंदे यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, केंद्राच्याही अशा सूचना आहेत. अनेक राज्यांनी या सूचनेचे पालन करत कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकार अशाच पद्धतीने नोंदी ठेवत आहे. केंद्राच्या अनेक योजना आहेत, कामगारांच्या या योजनांसाठी अशा नोंदी ठेवाव्याच लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी किती पर प्रांतिय अनेक राज्यातून आपापल्या घरी गेले त्याची नोंद झाली होती. भाजपवाल्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणे म्हणजे वेळ घालवण्यासारखा प्रकार असल्याची टीका मनिषा कायंदे यांनी केली.