‘मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील, नाहीतर…’ सामनातून सल्ला

2024 चे लक्ष्य’ वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील! असा सल्ला सामनाच्या आजच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

    देशात सध्या 2024 ला ‘लाट’ कुणाची? अशा चर्चा सुरु आहेत. मागील सात वर्ष सत्तेत असलेल्या भाजपचा पराभवकरुन पुन्हा एकदा आपली सत्ता आणण्याच्या तयारीत इतर पक्ष आहेत. त्यामुळेच मागील काही दिवसांपासुन दिल्लीत सोनिया गांधी यांच्यासोबत सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या चर्चांची खलबत सुरु आहेत. आता यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे.

    2024 चे लक्ष्य’ वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील! असा सल्ला सामनाच्या आजच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

    संसदीय अधिवेशनाच्या काळात सर्वच पक्षांचे नेते दिल्लीत असल्याने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सोबत 2024 च्या लोकसभा निवडणूकांची रणनिती ठरवली जातेय. या चर्चांमधे देशभरातील जवळपास 19 भाजप विरोधी विचारसरणीच्या पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्रा आता फक्त चर्चा करुन फायदा नाही काहीतरी कार्यक्रम राबवावा लागेल असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.

    काय म्हटलय सामनात?

    2024 चे लक्ष्य’ वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील!