शिवसेना माझ्यामुळे वाढली होती; माझ कुणीही वाकडं करु शकत नाही; नारायण राणेंचा थेट जाहीर इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thakre) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राणे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. महाड न्यायालयात (Narayan Rane In Mahad court) मंगळवारी रात्री उशीरापर्यंत रात्री उशीरा पर्यंत रंगलेल्या हायव्होलॉटेज ड्राम्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना जामीन मजुंर झाला. यानंतर राणे यांनी मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे शिवसेनेवर चौफेर टीका करताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thakre) यांच्यावर निशाणा साधला.

  मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thakre) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राणे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. महाड न्यायालयात (Narayan Rane In Mahad court) मंगळवारी रात्री उशीरापर्यंत रात्री उशीरा पर्यंत रंगलेल्या हायव्होलॉटेज ड्राम्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना जामीन मजुंर झाला. यानंतर राणे यांनी मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणे शिवसेनेवर चौफेर टीका करताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thakre) यांच्यावर निशाणा साधला.

  २७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु करणार असल्याचे राणेंनी जाहीर केले. १७ सप्टेंबरपर्यंत न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. अशी कोर्ट ऑर्डरच राणेंनी यावेळी पत्रकार परिषदेत दाखवली.

  नारायण राणे यांच्या भाषणातील महत्वाचे मुुद्दे

  •  ज्यांनी कधी उंदीर मारला नाही ते कोथळा काढण्याची भाषा करत आहेत
  • सेना भवनबद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबडं तोडा असे आदेश दिले. हा क्राईम नाही का? कलम १२० अंतर्गत गुन्हा होत नाही.”, असाप्रश्नही राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत उपस्थित केला.ॉ
  • शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे.
  • शिवसेनेत आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचं ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहण्याचे त्यांचे काम करावे.
  • तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत? एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. मी कुठल्याच कारवाईला घाबरत नाही.
   ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे
  • जन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे.
  • चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस बाकी खासदार आमदार सर्वच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले