धक्कादायक! मुंबईत ७ जणांनी घरात घुसून २० वर्षीय तरुणाची केली निर्घृण हत्या

पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत विशाल राम कारंडे याला  राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. विशाल याचे वडील राम कारंडे यांच्या तक्रारीवरून पंतनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाराम कारंडे यांनी याच विभागात राहत असलेले आरोपीचे नावे दिल्यावरून मुख्य आरोपी मनोज रनशूर ऊर्फ भावड्या यांच्यासह इतर सहा जणांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

    मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगती महामार्गाच्या बाजूला असलेल्या रमाबाई आंबेडकर कॉलनी परिसरात काल मध्यरात्री २० वर्षीय तरुणाची सहा ते सात जणांनी दगड, पेव्हर ब्लॉकने बेदम मारहाण करीत निर्घृण हत्या केल्याची घटना रात्री घडली आहे.पूर्ववैमनस्यातुन हा हल्ला केला असल्याची शक्यता आहे. विशाल राम कारंडे असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा या विभागातील काही व्यक्तींशी वाद होता. काल रात्री १ वाजताच्या दरम्यान या गटातील सहा ते सात जण त्याच्या घरात घुसले आणि त्याला फरफटत बाहेर काढले. त्यांनतर त्याला मारहाण करत धारधार शस्त्रांनी हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला.

    ही घटना इथल्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा ही कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत विशाल राम कारंडे याला  राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. विशाल याचे वडील राम कारंडे यांच्या तक्रारीवरून पंतनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाराम कारंडे यांनी याच विभागात राहत असलेले आरोपीचे नावे दिल्यावरून मुख्य आरोपी मनोज रनशूर ऊर्फ भावड्या यांच्यासह इतर सहा जणांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये किरण निर्भवणे ऊर्फ सोन्या, विवेक मोकल, अजय मोकल, अजय अहिरे, शिवम गवळी, साहिल जाधव यांचा समावेश असून सर्वजणं रमाबाई नगर, घाटकोपर येथे राहणारे असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर दोन ते तीन जणांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच आज सकाळी या विभागात सकाळपासून मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.