Shocking allegations against Anil Deshmukh; Claims to have bribed a CBI official with 'iPhone 12 Pro' to leak the report

अनिल देशमुखांनीच सीबीआयचा प्राथमिक तपास अहवाल लीक केल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयच्या एका उपनिरीक्षकाला ‘आयफोन 12 प्रो’ ची लाच देण्यात आल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

  दिल्ली : अनिल देशमुखांनीच सीबीआयचा प्राथमिक तपास अहवाल लीक केल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयच्या एका उपनिरीक्षकाला ‘आयफोन 12 प्रो’ ची लाच देण्यात आल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

  देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना ‘गिफ्ट’ दिल्याची चर्चा आहे. या गिफ्टमुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

  सीबीआयच्या प्राथमिक चौकशीचा एक अहवाल काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. या अहवालात देशमुखांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नाही. तसेच सचिन वाझेंना पुन्हा नोकरीमध्ये घेण्याच्या प्रकरणातही देशमुखांनी कोणताही हस्तक्षेप केल्याचे समोर येत नाही, असा दावा करतानाच सीबीआयच्या या प्राथमिक चौकशी अहवालात देशमुखांना क्लीन चिट देण्यात आली होती.

  पुण्यात झाली होती भेट!

  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यानुसार 28 जून 2021 रोजी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी पुण्यात आले होते. त्यावेळी देशमुख यांचे वकील डागा यांच्याशी त्यांची भेट झाली होती आणि तपासासंबंधी तपशील देण्याच्या बदल्यात तिवारी यांना आयफोन दिला होता, अशी माहिती सीबीआयच्या तपासात पुढे आली आहे.

  वकिलांच्या नियमित संपर्कात असल्याचा दावा

  देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणारे उपनिरीक्षक तिवारी हे नियमितपणे माजी मंत्र्याच्या वकिलांच्या संपर्कात होते आणि लाच घेत असा सीबीआयचा आरोप आहे. तिवारी यांच्याकडून जप्त करण्यात आलेला ‘आयफोन 12 प्रो’ फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  तपासाची कागदपत्रे व्हॉटस्अॅपवर पाठवली

  माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या प्रकरणातील तपासाशी संबंधित कारवाईची कागदपत्रे, मेमोरँडम, सीलिंग-अनसेलींग मेमोरँडम, स्टेटमेंट आणि जप्ती मेमोरँडम अशा प्रकारच्या विविध दस्तऐवजांच्या प्रती तिवारी यांनी वकील डागा यांना व्हॉटस्अॅपवर पाठविल्या. सीबीआयने तपासाचा एक भाग म्हणून देशमुख यांच्याविरोधातील संवेदनशील कागदपत्रे ताब्यात घेण्याची जबाबदारी तिवारी यांच्यावर सोपविली होती, मात्र त्यांनी विश्वासघात केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]