अनिल देशमुखांच्या वकीलाचे धक्कादायक दावे! सचिन वाझेच्या प्रतिज्ञापत्रात फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचा खुलासा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांचे वकील अॅड. कमलेश घुमरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत. सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या आयोगासमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र साद केले. मात्र त्यात त्याने काहीच सांगितले नाही. त्यात तो ४ कोटी ७० लाख रुपयांबाबत काही बोलत नाही. अनिल देशमुख यांना भेटल्याचेही वाझे सांगत नाही. आपण फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचे सांगत वाझे सांगत असल्याचा खुलासा देखील वकील घुमरे यांनी केला आहे. ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असतो. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिले आहे, असेही देशमुख यांचे वकील घुमरे म्हणाले.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांचे वकील अॅड. कमलेश घुमरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासे केले आहेत. सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या आयोगासमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र साद केले. मात्र त्यात त्याने काहीच सांगितले नाही. त्यात तो ४ कोटी ७० लाख रुपयांबाबत काही बोलत नाही. अनिल देशमुख यांना भेटल्याचेही वाझे सांगत नाही. आपण फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचे सांगत वाझे सांगत असल्याचा खुलासा देखील वकील घुमरे यांनी केला आहे. ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असतो. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिले आहे, असेही देशमुख यांचे वकील घुमरे म्हणाले.

    वाझेचा जबाब दबावाखालीच

    ते म्हणाले की, आम्ही गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ईडीकडून अनेक बातम्या येत होत्या. त्यात अनेक विसंगतीही होत्या. नक्की सत्यता काय आहे? हे सांगण्यासाठीच आपण आज समोर आलो आहोत असे घुमरे म्हणाले. ते म्हणाले की, आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिले असे सांगत नाही. सचिन वाझे यांनी दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो. CRPC मध्ये पोलिसांसमोर दिलेला जबाब स्वीकारला जात नाही. शंभर कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे, असा दावाही घुमरे यांनी केला.

    कुटूंबियांना ईडी समन्स

    दरम्यान, आतापर्यंत अनिल देशमुख, आरती देशमुख, ऋषिकेश देशमुख या तीन जणांना ईडीने समन्स दिले आहे. आरती देशमुख यांना आज समन्स दिले होते. त्या ६६ वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहे. त्यांचा व्यवहाराशी काही संबंध नाही, असेही घुमरे यांनी सांगितले. ईडीचे कागदपत्र पेपर हे सार्वजनिक व्हायला हवे, अशी मागणीही देशमुखांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत केली.