rajesh tope

राजेश टोपे म्हणाले की, 'GCC Biotech Ltd कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात वितरित झालेल्या किट्समध्ये मोठ्या प्रमाणात लो पॉझिटिव्हिटी रेट आढळला आहे. एनआयव्हीचा असा अहवाल आहे की GCC Biotech Ltd च्या किट्स सदोष आहेत. आता दोनच पर्याय उरतात. अशा किट्स पुरवणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. जिथे किट्सचं वाटप झालं आहे तिथले निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे.

मुंबई : राज्यातील नागरिक कोरोना (Corona) संकटाने त्रस्त आहेत. त्यातच नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढच होताना दिसत आहे. राज्यात कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या १२ लाख ५० हजार किट्स सदोष (12 lakh faulty RT-PCR kits ) आढळल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Shocking confession of health minister) तसेच राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या किटसची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येत असून कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले की, ‘GCC Biotech Ltd कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात वितरित झालेल्या किट्समध्ये मोठ्या प्रमाणात लो पॉझिटिव्हिटी रेट आढळला आहे. एनआयव्हीचा असा अहवाल आहे की GCC Biotech Ltd च्या किट्स सदोष आहेत. आता दोनच पर्याय उरतात. अशा किट्स पुरवणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. जिथे किट्सचं वाटप झालं आहे तिथले निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये असं टोपे यांनी सांगितलं.

एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील. ही घटना पुन्हा घडू नये याची काळजी घेण्यासाठी ज्या किट्स हाफकिनकडून खरेदी केल्या जातात, त्या खरेदीसंदर्भात एनआयव्हीच्या तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. टेस्टिंग हा महत्त्वाचा विषय आहे. त्याची सेन्सिटिव्हिटी जर २७ टक्क्यांपर्यंत खाली आली तर चुकीचे निकाल येतील. म्हणून याबाबत पूर्ण सतर्कता आणि दक्षता घेतली जाईल.’