Shocking incident in Mumbai An angry friend kills a friend in a fit of rage as he repeatedly loses the game of Ludo in Mobile

मोबाईल मधील लुडो या खेळात वारंवार पराभव होत असल्याने रागाच्या भरात संतप्त मित्राने मित्राची हत्या केली. हत्येची बाब उघडकीस येऊ नये म्हणून या मित्रानेच 10 हजार रुपये देऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले आणि मित्राचे अंतिम संस्कारही केले.

    मुंबई : लुडो खेळता सारखा हारत होता मग रागाच्या भरात जिंकणाऱ्या मित्राचा खेळच खल्लास केला. मुंबईत ही धक्कादायक घटना घडलेय.

    मोबाईल मधील लुडो या खेळात वारंवार पराभव होत असल्याने रागाच्या भरात संतप्त मित्राने मित्राची हत्या केली. हत्येची बाब उघडकीस येऊ नये म्हणून या मित्रानेच 10 हजार रुपये देऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले आणि मित्राचे अंतिम संस्कारही केले.

    मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. तुकाराम नलवडे असे मृतकाचे आणि अमित राज पोपट असे आरोपीचे नाव आहे.