धक्कादायक… सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मानेवर लिगेचर मार्क असल्याचा उल्लेख

तसेच रिपोर्टनुसार सुशांतच्या तोंडातून किंवा नाकातून फेस अथवा रक्त स्त्राव झाला नाही. मात्र मानेच्या खाली ३३ सेंटीमीटर लांब लिगेचर मार्क होते. त्याच्या गळ्याला ८ सेंमी फासाची खूण होती. रिपोर्टनुसार सुशांतच्या वडिलांनी केलेल्या वकिलाने रिपोर्टवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला २ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. तरी आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. मुंबई पोलिसांनीही तपासामध्ये कोणते कारण स्पष्ट केले नाही. सुशांतचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यावर तपासाला वेग आला आहे. सीबीआयची टीम सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास अगदी लक्षपूर्वक हाताळत आहे. शनिवारी सुशांत सिंगचा ७ पानांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट डॉक्टरांनी सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक माहितीचा खुलासा झाला आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्याच्या गळ्यावर ३३ सेंमी लांब लिगेचर मार्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. खोलवर असलेल्या खूणेला लिगेचर मार्क म्हणतात. तसेच आत्महत्येनंतर सुशांतची जीभ बाहेर नव्हती, त्याचे दात ठीक होते, शरीरावर इतर कोणत्याही जखमा किंवा व्रण नव्हते. त्याच्या पापण्याही अर्धवट मिटलेल्या होत्या. शरीरातील कोणतीही हाडं तुटली किंवा मोडली नव्हती.

तसेच रिपोर्टनुसार सुशांतच्या तोंडातून किंवा नाकातून फेस अथवा रक्त स्त्राव झाला नाही. मात्र मानेच्या खाली ३३ सेंटीमीटर लांब लिगेचर मार्क होते. त्याच्या गळ्याला ८ सेंमी फासाची खूण होती. रिपोर्टनुसार सुशांतच्या वडिलांनी केलेल्या वकिलाने रिपोर्टवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत.

सीबीआयने हा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ताब्यात घेतला आहे. तसेच हा रिपोर्ट ५ डॉक्टरांच्या टीमने लिहिला होता. या पाचही डॉक्टरांची चौकशी सीबीआय करणार आहे. तसेच रिया चक्रवर्ती शवगृहात काय करत होती. तिथे कशाला गेलेली, याचाही सीबीआय कसून तपास करणार असल्याचे समजते आहे.