Short circuit in ministry; Many ministers including Eknath Shinde are in the dark

मंत्रालयात पुन्हा शॉर्टसर्किट झाला आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा धोका अनर्थ टळला. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून, एकनाथ शिंदेसह अनेक मंत्र्यांची दालने अंधारात आहेत. लाईट नसल्याने अनेक विभागाची कामे देखील खोळंबली आहेत.

मुंबई : मंत्रालयात पुन्हा शॉर्टसर्किट झाला आहे. ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा धोका अनर्थ टळला.

मंत्रालयाच्या जुन्या अनेक्स इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाला. यामुळे येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने वायरिंग जळून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून, एकनाथ शिंदेसह अनेक मंत्र्यांची दालने अंधारात आहेत. लाईट नसल्याने अनेक विभागाची कामे देखील खोळंबली आहेत. युद्धपातळीवर दुरुस्ती चे काम सुरू आहे.