bhai jagtap

आमदार भाई जगताप यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत पाठोपाठ आता माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. तसेच राज्यपालही महाविकास आघाडीवर टीका करत असतात. यावरुन काँग्रेस विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap)  यांनी खोचक टीका केली आहे.

आमदार भाई जगताप यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राजभवनाला  (Raj Bhavan) सध्या आरएसएस शाखा (RSS branch) किंवा भाजप कार्यालय (BJP office) म्हणून तात्पुरते नामकरण करावे का, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.


दरम्यान, आमदार भाई जगताप यांनी कंगना रणौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. गोंधळानंतर काही वेळासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.