माणसाने लॅविश राहू नये का?, मला चांगलं राहणीमान आवडतं  ;  नितीन राऊत यांचे  भाजपला उत्तर

मी दलित समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही टीकाकारांसाठी सॉफ्ट वेपन असतो. सगळेजण आमच्यावर टीका करतात, आम्ही काही काम करू शकत नाही असा आरोप करतात. आरोप करणार्‍या बातम्या कोण चालवते हे बघितले पाहिजे. नुसत्या बातम्या चालवल्याने काही होत नाही, बातम्या बघून पक्षश्रेष्ठी काही माझे खात काढणार नाही. ते माझ्याकडे राहणार आहे, असे राऊत म्हणाले.

    मुंबई : मी कोणतेही नियमबाह्य काम केले नसून गेले वर्षभर मी भाड्याच्या घरी राहत होतो. मला चांगले रहायला आवडते,असा सवाल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपला केला. राज्यात सामान्यांच्या घरची वीज तोडली जात असताना ऊर्जामंत्र्यांच्या अलिशान घरावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे असा आरोप भाजपने केला होता. त्यावर राऊत यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

    पर्णकुटी अजूही वाई अवस्थेत

    ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, पर्णकुटी बांगला अजून ही वाईट अवस्थेत आहे, त्याचे काम सुरू आहे. गेले एक वर्ष झाले तरी शासकीय निवासस्थान मिळाले नाही. कोरोना काळात शासकीय निवासस्थान मिळाले नसल्याने भाड्याच्या घरात राहीलो. तेव्हा म्हंटल एक किंवा दोन रूम तरी तयार करुन द्या. आता घर मिळाले असले तरी त्यामध्ये अजून काम सुरू आहे, असे राऊत म्हणाले.

    नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही

    माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगले राहायला आवडते. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही असे सांगत नितीन राऊत म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे. लोकांना जे समजायचे ते समजावे. माझे किचन बघा हे लॅविश आहे का? माणसाने लॅविश राहू नये का? लोकांना वाटते मी ऊर्जा खात्यात काम करतो, ते लोकांना सलत आहे त्यामुळे त्यांना तिरस्कार वाटतो, त्यांच्या पोटात जळत आहे.

    बातम्या बघून पक्षश्रेष्ठी काही माझे खाते काढणार नाहीत

    मी दलित समाजाचा व्यक्ती आहे. आम्ही टीकाकारांसाठी सॉफ्ट वेपन असतो. सगळेजण आमच्यावर टीका करतात, आम्ही काही काम करू शकत नाही असा आरोप करतात. आरोप करणार्‍या बातम्या कोण चालवते हे बघितले पाहिजे. नुसत्या बातम्या चालवल्याने काही होत नाही, बातम्या बघून पक्षश्रेष्ठी काही माझे खात काढणार नाही. ते माझ्याकडे राहणार आहे, असे राऊत म्हणाले. फोटोत दिसत असलेला टीव्ही मी माझ्या खर्चाने आणला आहे. माझ्या आधीच्या घरी मोठा टीव्ही होता. तुम्ही इतर मंत्र्यांचे बंगले पाहिले तर ते देखील तसेच आहेत असंही नितीन राऊत म्हणाले. मी वेगळे काही केले नाही असे सांगत ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या घरात काय खर्च केला हे त्यांनी पाहावे. हे जर बाहेर आले तर वाद होईल. मला कोणतेही आरोप करायचे नाहीत, मी जे काही केले ते नियमानुसार केले.

     

    सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे. लोकांना जे समजायचे ते समजावे. माझे किचन बघा हे लॅविश आहे का? माणसाने लॅविश राहू नये का? लोकांना वाटते मी ऊर्जा खात्यात काम करतो, ते लोकांना सलत आहे त्यामुळे त्यांना तिरस्कार वाटतो, त्यांच्या पोटात जळत आहे.

    - नितीन राऊत, उर्जामंत्री.