सिद्धार्थचा अर्थमंत्र्यांना थेट सवाल : ‘मामी, एवढी पेट्रोलवाढ झाली हे काय बरं नाही’

सध्या पेट्रोलचे दर १०० रुपये प्रतिलीटर एवढे आहेत. त्याचा निषेध म्हणून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स तयार व्हायला लागले आहेत. सिध्दार्थ सोशल मीडियावर चर्चेत असणारा अभिनेता आहे. सिध्दार्थनं अर्थमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने त्यांच्या आर्थिक धोरणावर टीका केली आहे.

    मुंबई : देशभरात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या डोक्याला शॉक लागण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वसामान्य नागरिकांचा खिसा फाटायची वेळ आली असून एवढे न परडवणारे दर आता पेट्रोलचे झाले आहेत. यावरुन नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. दुसरीकडे काही सेलिब्रेटींनी सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीविषयी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. रंग दे बसंतीमधील प्रसिध्द कलाकार सिध्दार्थची प्रतिक्रिया व्हायरल झाली असून त्यावरुन चर्चा रंगली आहे.

    सध्या पेट्रोलचे दर १०० रुपये प्रतिलीटर एवढे आहेत. त्याचा निषेध म्हणून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स तयार व्हायला लागले आहेत. सिध्दार्थ सोशल मीडियावर चर्चेत असणारा अभिनेता आहे. सिध्दार्थनं अर्थमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने त्यांच्या आर्थिक धोरणावर टीका केली आहे. तो सामाजिक, राजकीय विषयांवर बिनधास्तपणे प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखला जातो. त्याचं झालं असं की, प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांनी निर्मला सीतारामन यांच्या दोन विधानांवर चर्चा करण्यात आली आहे.

    २०१३ मध्ये जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा देखील निर्मला सीतारामन यांनी त्या सरकारला पेट्रोलचे दर वाढले म्हणून दोषी ठरवले होते. आता तेच म्हणत आहेत की तेलाचे भाव वाढण्यामागे त्याचे उत्पादन करणा-या कंपन्या आहेत. प्रशांत भूषण यांच्या त्या व्टिटवर सिध्दार्थ याने प्रतिक्रिया दिली होती. सिध्दार्थनं लिहिले आहे की, मामी, ज्यावर विश्वास ठेवतात त्यानुसार बदलत जातात. असे आतापर्यत दिसून आले आहे. मग त्यात कांदा, आश्वासनांचा पडलेला विसर हे सगळे आले. मामी रॉक्स असे त्यानं म्हटलं आहे.

    सीतारामण म्हणाल्या होत्या की, इंधन दरवाढ हा असा एक मुद्दा आहे की त्यात जनतेला संतुष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे जी वास्तविकता आहे ती समोर आणणं गरजेचं आहे. तेव्हाही लोकांना वाटेल की मी दोन्ही बाजूंनी बोलत आहे म्हणून. हा खरोखर खूप गंभीर मुद्दा आहे. पेट्रोलच्या किंमतीवर सरकारचे कुठलेच नियंत्रण नाही. तेल कंपनी कच्च्या तेलाची आयात करतात. ते रिफाईन करतात आणि त्याचे वितरण करतात. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.