Which exactly are the 12 peoples on the Legislative Council Urmila from Shiv Sena's quota List to Governor on Monday

शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये लढत असताना भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध केल्याने त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन मागे घेण्यात आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत.

    मुंबई : महाआघाडीतील तीन पक्षानी एकमेकाच्या पक्षातून आलेल्यांना प्रवेश देताना समन्वय आणि चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. त्यानंतर दुस-याच दिवशी शिवसेनेच्या दोन दिग्गजांनी जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा झाल्याने महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीचे संकेत मिळत आहेत. ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) आणि शिवसेनेचे वर्धा येथील उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यानी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली आहे.

    सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काँग्रेसमध्ये

    शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख आणि बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये लढत असताना भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध केल्याने त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन मागे घेण्यात आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत.

    उपनेते अशोक शिंदेचा जय महाराष्ट्र !

    दुसरीकडे, शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.