सायन रुग्णालयातील रुग्णाचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

मुंबई: सायन रुग्णालयात दाखल असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आज दुपारच्या सुमारास खिडकीतून उडी मारून पळून जात असल्याचे ड्यूटीवर हजर असलेल्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर या रुग्णाला

मुंबई: सायन रुग्णालयात दाखल असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आज दुपारच्या सुमारास खिडकीतून उडी मारून पळून जात असल्याचे ड्यूटीवर हजर असलेल्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यानंतर या रुग्णाला सुरक्षारक्षकांनी शिताफीने पकडून पुन्हा वॉर्डमध्ये दाखल केल्याचे समजते. आधीच सायन रुग्णालयावर विविध कारणांमुळे टीका होत आहे. त्यात आता रुग्ण पळून जाण्याचा प्रकार घडत असल्याने टीकेसाठी अजून एक कारणच मिळाले आहे.