Police stripped the young women of their clothes and made them dance; Home Minister's shocking revelation in the Legislative Assembly about what happened in the Ladies Hostel in Jalgaon

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांनी(mohan delkar death) काही दिवसांपुर्वी मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साउथ हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनास्थळावरून पोलिसांना १५ पानांची एक सुसाइड नोट सापडली होती. सुसाईड नोटमध्ये पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भाजपचे नेते व गुजरातचे माजी गृहमंत्री व दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव होते. याचा तपास एसआयटी करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात केली आहे.

    मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांनी(mohan delkar death) काही दिवसांपुर्वी मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साउथ हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनास्थळावरून पोलिसांना १५ पानांची एक सुसाइड नोट सापडली होती. सुसाईड नोटमध्ये पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भाजपचे नेते व गुजरातचे माजी गृहमंत्री व दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव होते. याचा तपास एसआयटी करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात केली आहे.

    खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमधील नावं असलेल्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मनसुख प्रकरणावरुन विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन सरकारला धारेवर धरले.

    यानंतर शिवसेनेने खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्येप्रकरणी कुणाला अटक का झाली नाही? त्यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असलेल्या सर्वांना अटक व्हायला हवी अशी मागणी करत परिवहनमंत्री अनिल परब आणि सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातला. या सर्व गोंधळानंतर गृहमंत्र्यांनी डेलकर यांच्या प्रकरणाचा एसआयटी तपास करणार असल्याची घोषणा केली.