वाशी ईटीसी कोविड सेंटरमध्ये सहा फुटी साप; कोविड सेंटरमध्ये खळबळ

मुंबई (Mumbai): वाशी ईटीसी केंद्रात रविवारी साप आढळल्याने खळबळ उडाली. सर्पमित्र मंगेश संभेराव यांनी तातडीने धाव घेत या सापाला पकडून हिरवळीच्या ठिकाणी सोडून दिल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. नवी मुंबई वाशी येथे दिव्यांग मुलांसाठी असलेले पालिकेचे ईटीसी केंद्र कोविड सेंटर म्हणून तात्पुरत्या स्वरूपात तयार केले आहे. या ठिकाणी कोविड रुग्ण उपचार घेत असून पालिकेचा सर्व स्टाफ कार्यरत आहे.

नवी मुंबई (New Mumbai).  वाशी ईटीसी केंद्रात रविवारी साप आढळल्याने खळबळ उडाली. सर्पमित्र मंगेश संभेराव यांनी तातडीने धाव घेत या सापाला पकडून हिरवळीच्या ठिकाणी सोडून दिल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. नवी मुंबई वाशी येथे दिव्यांग मुलांसाठी असलेले पालिकेचे ईटीसी केंद्र कोविड सेंटर म्हणून तात्पुरत्या स्वरूपात तयार केले आहे. या ठिकाणी कोविड रुग्ण उपचार घेत असून पालिकेचा सर्व स्टाफ कार्यरत आहे.

रविवार दि. 25 ऑक्टोबर रोजी येथील कर्मचाऱ्यांस मोठा साप निदर्शनास आला. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये खळबळ माजली. काही कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान राखत साप कोठे जातोय यावर लक्ष ठेवले. त्याचवेळेस सर्पमित्र मंगेश संभेराव यांना बोलवण्यात आले. संभेराव यांनी तातडीने पोहोचत साप असलेली ठिकाणी शोध घेतला. सेंटरच्या बाजूला असलेल्या अडगळीच्या जागेत हा साप आढळून आला.जवळपास 6 फूट लांबीचा धामण जातीचा साप सर्पमित्र संभेराव यांनी सुरक्षितरीत्या पकडला.तसेच या सापाबद्दल उपस्थितांना माहिती देत व जनजागृती करत सापाला सुखरूपरित्या रहिवाशी भागापासून लांब दाट हिरवळीच्या जागी सोडण्यात आले.