जे. जे. हॉस्पिटलमध्ये लवकरच सुरु होणार स्मार्ट ओपीडी

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णाच्या अधिकाधिक स्वॅब घेता यावेत यासाठी आता जे. जे. हॉस्पिटलमध्ये स्मार्ट ओपीडी सुरु करण्यात येत आहे. यामुळे जे.जे. हॉस्पिटलमध्ये आता संशयित कोरोना

मुंबई:  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णाच्या अधिकाधिक स्वॅब घेता यावेत यासाठी आता जे. जे. हॉस्पिटलमध्ये स्मार्ट ओपीडी सुरु करण्यात येत आहे. यामुळे जे.जे. हॉस्पिटलमध्ये आता संशयित कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. जे. जे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या संशयित कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत असते. त्यामुळे या रुग्णांमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यात लक्षात घेता आता संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा स्वॅब जेजे हॉस्पिटलमध्येच घेता यावा, यासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये स्मार्ट ओपीडी सुरु करण्यात येत आहे. ही ओपीडी सेंट जॉर्ज हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल आणि मनीलाईफ फाऊंडेशनच्य माध्यमातून उभारण्यात येत आहे. या ओपीडीमध्ये प्लस ऑक्सिमीटर, डिजिटल स्टेथोस्कोप असणार आहे. यामुळे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांचा स्वाब घेताना रुग्णाशी थेट संपर्क येणार नाही. त्यामुळे सध्या वापरण्यात येत असलेले पीपीई किटचीही बचत होण्यास मदत होणार आहे