बिबट्याच्या कातड्याची तस्करी ; खेरवाडी पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबई पोलीस दल रात्र-दिवस कर्तव्य बजावत आहेत. गैरधंद्यांवर, गुन्हे प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष ठेवून असताना खेरवाडी पोलिसांना बिबट्याच्या कातड्याची तस्करी होणार असल्याची माहिती समजली. त्यानुसार खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाने (एटीसी) वांद्रे पूर्व परिसरातील कलानगर येथील महापालिकेच्या उद्यानाजवळ सापळा लावला.

    मुंबई : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या. ही खेरवाडी पोलिसांनी गुरुवारी केली. या कारवाईत २२ लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे, शेपटी व वाघ नखे जप्त करण्यात आले आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबई पोलीस दल रात्र-दिवस कर्तव्य बजावत आहेत. गैरधंद्यांवर, गुन्हे प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष ठेवून असताना खेरवाडी पोलिसांना बिबट्याच्या कातड्याची तस्करी होणार असल्याची माहिती समजली. त्यानुसार खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाने (एटीसी) वांद्रे पूर्व परिसरातील कलानगर येथील महापालिकेच्या उद्यानाजवळ सापळा लावला. त्यावेळी तेथे एक इसम आला. त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून खेरवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडी काळ्या-पांढऱ्या रंगांच्या प्लॅस्टिक पिशवीची झडती घेतली असता त्यात बिबट्याचे कातडे आढळून आले. चौकशीदरम्यान त्या इसमाने स्वत:चे नाव मनोज बडवे (६१, रा. दादर, मुंबई) असे सांगितले.

    बिबट्याचे कातडे बाळगल्या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून बडवेला अटक करण्यात आली. बडवे याने सदर कातडे कोठून आणले? कोणाला देणार होता याचा तपास सुरू असल्याचे खेरवाडी पोलिसांनी सांगितले. ही कारवाई परिमंडळ ८ चे मंजुनाथ सिंगे, खेरवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास चव्हाण, खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील यअम, पोलीस अंमलदार आशुतोष पाटील, सुदर्शनन लोखंडे, तुषार जाधव, बाळू रूपवते आदी पथकाने केली.