... so don't catch a running locomotive; Thrilling CCTV footage of Mumbra railway station

ठाणे : “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीची प्रचीती मुंब्रा स्थानकावर आली. रेल्वे लोकलखाली सापडण्यापूर्वीच महिलेला रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या आरपीएफ जवानाने तिचे प्राण वाचले.

शनिवारी रात्रीच्या वेळेस ही घटना घडली. आरपीएफ जवान मंगेश वाघ हा महिलेचा प्राणरक्षक ठरला. त्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

जिया शहजाद शेख(४५)  या शनिवारी रात्री मुंब्रा स्थानकावर आपली मुलगी नाजिया सोबत सीएसटी लोकल पकडत होता. लोकल सुटत असल्याने मुलगी नाजियाने धावत लोकल पकडली. मात्र, धावती लोकल पकडत असताना  जिया या खाली पडल्या आणि गडगडत रेल्वे लोकल आणि प्लॅटफॉर्म मधील गॅपमधून रेल्वे लोकलच्या खाली जात असतानाच कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवान  मंगेश वाघ याने विजेच्या चपळाईने जिया याना पकडले आणि त्यांचे प्राण वाचले.

जिया शेख यांनी वाघ यांचे आभार मानले तर सर्व प्रवाशांनी मंगेश वाघ याचे कौतुक केले. या अपघाताचा CCTV फुटेज प्रसिद्ध करण्यात आले आहे.