adar poonawala

कोविशिल्ड लस तयार करणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची आवश्यकता असल्यास सरकारने ती पुरवावी, असे निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले. तसेच पुनावाला यांनी देशाच्या हितासाठी मोठे योगदान दिले असल्याचे नमूद करत खंडपीठाने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

    मुंबई : कोविशिल्ड लस तयार करणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची आवश्यकता असल्यास सरकारने ती पुरवावी, असे निर्देश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला दिले. तसेच पुनावाला यांनी देशाच्या हितासाठी मोठे योगदान दिले असल्याचे नमूद करत खंडपीठाने त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

    देशात सर्वत्र कोरोनावरील लसींचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईसह माहराष्ट्रात लसींअभावी लसीकरण प्रक्रियेला खिळ बसली आहे. त्यातच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांना लसीसाठी अनेक बड्या राजकीय व्यक्तींकडून धमक्यांचे फोन आले असून त्यांनी याबाबत युकेतील एका इंग्रजी वृत्तपत्राला मूलाखत दिली होती. पुनावाला हे सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत ब्रिटनमध्ये रहात आहेत. त्यामुळे पुनावाला यांना धमकवणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅड. दत्ता माने यांनी याचिकेतून केली आहे. तसेच पुनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची तरतूद करावी असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

    या याचिकेवर गुरुवारी सुनावणी पार पडली. खंडपीठाने पुनावाल यांच्या कार्याची प्रथम दखल घेत त्यांची प्रशंसा केली. पुनावाला हे देशासाठी उत्कृष्ट कार्य करत असून त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या धमकीची दखल घ्यायलाच हवी. जगभरात भारताची चांगली प्रतिष्ठा आहे आणि अशा कारवाईचा आंतरराष्ट्रीय स्थरावर नक्कीच परिणाम होईल, असे स्पष्ट करत खंडपीठाने राज्य सरकारला याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.