…तर महाराष्ट्राचे किती कौतुक व्हायला हवे याचा विचार करतोय! जयंत पाटील यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

उत्तरप्रदेश सरकारच्या कोरोना काळातील कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी टप्प्यातील ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.  त्यामुळे टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच... हे वाक्य जयंतराव पाटील यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवले आहे!

    मुंबई : उत्तरप्रदेश सरकारच्या कोरोना काळातील कामाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी टप्प्यातील ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.  त्यामुळे टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच… हे वाक्य जयंतराव पाटील यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवले आहे!

    योगी सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने चांगले काम केले अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्यावर ‘उत्तरप्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली.

    अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असे म्हटले असेल तर महाराष्ट्राचे किती कौतुक व्हायला हवे याचा विचार मी करतोय !’ असा चिमटा जयंतरावानी मोदींना काढला आहे.