…तर वाघाशी पुन्हा दोस्ती करु! चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला ऑफर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली़, ही चांगली गोष्ट आहे. मोदींशी ठाकरेंचे चांगले जमत आहे़ मग आमच्याशीच का जमत नाही, हे माहित नाही़ परंतु वरिष्ठांचा आदेश असेल तर आम्ही वाघाशी पुन्हा दोस्ती करु, अशी ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली़, ही चांगली गोष्ट आहे. मोदींशी ठाकरेंचे चांगले जमत आहे़ मग आमच्याशीच का जमत नाही, हे माहित नाही़ परंतु वरिष्ठांचा आदेश असेल तर आम्ही वाघाशी पुन्हा दोस्ती करु, अशी ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. राज्यातील प्रश्नांवर एक तास चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसोबत वैयक्तिक भेट घेतली आहे. या भेटीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहे.त्यावर प्रतिकि्रया व्यक्त करताना पाटील बोलत होते़

    दोन मोठ्या माणसाच्या भेटीमध्ये काय घडले आहे हे सांगता येणार नाही. पण आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती़ परंतु उद्धव ठाकरे यांची मोदींसोबत जुनी मैत्री आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांसोबत त्यांचे पटत नाही. ठाकरेंची आमच्याशी मैत्री असती तर १८ महिन्यांपूर्वी आमचे सरकार आले असते असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

    हे सुद्धा वाचा