maratha reservation

संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षण बाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणाची बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडले

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण  (Maratha reservation) देण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरु असलेल्या राजकारणाचा मराठा आरक्षण बळी ठरत आहे. पण आम्ही ५० कार्यकर्त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. प्रसंगी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरु, असे सांगत असतानाच आरक्षण न मिळाल्यास मराठा तरुण (Maratha youth ) नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा इशारा संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) दिला.

संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षण बाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणाची बाजू मांडण्यास राज्य सरकार कमी पडले

राम मंदिर, तीन तलाक आणि काश्मीर बाबत केंद्र सरकार पुढाकार घेते, मग मराठा आरक्षणासाठी का घेत नाही ? मराठा आरक्षण हा देखील श्रद्धा आणि आस्थेचा विषय असून केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या राजकारणात मराठा आरक्षणाचा बळी देऊ नये, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलं.