…म्हणून पुढच्या वेळेस चड्डीत राहायचं; शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे आक्रमक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातील स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर मोठा गदारोळ उठला आहे. नारायण राणे यांच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळ गोमूळ आणि दुग्धाभिषेक करून त्याचं शुद्धीकरण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान यानंतर आता नितेश राणे यांनी आपल्या शैलीत महाविकास आघाडी सरकारवर हल्ला बोल करण्यास सुरुवात केली आहे.

    मुंबई : भाजपने आयोजित केलेल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कातील स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर मोठा गदारोळ उठला आहे. नारायण राणे यांच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळ गोमूळ आणि दुग्धाभिषेक करून त्याचं शुद्धीकरण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

    दरम्यान यानंतर आता नितेश राणे यांनी आपल्या शैलीत महाविकास आघाडी सरकारवर हल्ला बोल करण्यास सुरुवात केली आहे. नितेश राणे यांनी ट्वीट करीत आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, अडवण्याची भाषा करणारे आता गोमूत्रावर आले, म्हणून पुढच्या वेळ चड्डीत राहायचं. आता नितेश राणे यांच्या ट्विटनंतर शिवसैनिक काही गप्प बसणार नाही हे तर नक्की.

    त्यामुळे शुक्रवारी यावर अनेक शिवसेनेचे नेते प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. आज राजकीय वर्तुळात शुद्धीकरणाचा विषय चर्चेत होता. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही जहरी टीका केली आहे.