school

टि आय एफ आरचे प्रमुख (डीन) डॉ संदीप जुनेजा यांच्याकडे या अभ्यास गटाचे नेतृत्व आहे. सूत्रांनी सांगितले की, या अभ्यास गटाने मुंबईत मागील महिनाभरात केलेल्या अभ्यासातून दिसून आले की, २.३ लाख लोकांना कोरोनाचा फटका बसला असून त्यातील १४७९ जणांना जीव गमवावा लागला आहे. १मे च्या एका दिवसांत मुंबईत कोरोनाचे ९० बळी होते. आता पर्यंतचे एका दिवसांतील सर्वाधिक मृत्य़ू २४ जून २०२० मध्ये १२० होते. आकडेवारीच्या अभ्यासानुसार सार्स- कोव्ह-२चा प्रसार झपाट्याने करण्यात रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या सेवांचा मोठा हातभार लागला आहे.

  किशोर आपटे,मुंबई :  मे आणि जून महिन्यात मुंबईत दररोज किमान दोन लाख नागरीकांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली तर येत्या जुलै महिन्याच्या मध्यात शाळा आणि महाविद्यालये नियमीतपणे सुरू करता येवू शकतील असा आशादायक अहवाल टाटा फंडामेंटल इन्स्टिट्यूट (टीआयएफआर) च्या तज्ज्ञांनी दिल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांच्या माहितीनुसार या तज्ज्ञांनी दिलासा दिला आहे की, येत्या काळात नव्याने कोरोना व्हेरीयंट म्युटेशन झाले नाही तर १८ ते ४४ वयोगटाच्या सुमारे ७५ टक्के नागरीकांना पहिला डोस देवून पुढील दोन महिन्यात सुरक्षीत केले जावू शकते असा आशादायक निष्कर्ष काढल्याचे सांगण्यात येत आहे.

  लसीकरणाला वेग देण्याचा एकमेव मार्ग
  या सूत्रांनी सांगितले की, अर्थातच हा उपलब्ध आकडेवारी आणि जागतिक स्थितीचा केलेल्या अभ्यासावरील ठोकताळा आहे, मात्र आता कोविड स्थितीतून जनतेला सुरक्षीत करण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याचा एकमेव मार्ग असल्याचे जगभरात मान्य झाले आहे. कोविड-१९चा सर्वाधिक प्रसार मुंबई आणि पुणे या औद्योगिक परिसरात झपाट्याने झाला त्यामुळे या भागात दोन महिने दररोज किमान दोन लाख नागरीकांना सलग लसीकरणाची पहिला मात्रा देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात वेगाने लसीकरण करण्यावर सरकारचा भर राहणार असून या मोहिमेच्या परिणामकारकतेचा अभ्यास जुलै अखेर अभ्यास करून अहवालात सादर केला जाणार आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सर्वात तरूण लोकसंख्या या भागात आहे जे उद्योग व्यवसाया निमित्त बाहेर कार्यरत आहेत.

  प्रसारात लोकल ट्रेनच्या गर्दीचा मोठा हातभार
  टि आय एफ आरचे प्रमुख (डीन) डॉ संदीप जुनेजा यांच्याकडे या अभ्यास गटाचे नेतृत्व आहे. सूत्रांनी सांगितले की, या अभ्यास गटाने मुंबईत मागील महिनाभरात केलेल्या अभ्यासातून दिसून आले की, २.३ लाख लोकांना कोरोनाचा फटका बसला असून त्यातील १४७९ जणांना जीव गमवावा लागला आहे. १मे च्या एका दिवसांत मुंबईत कोरोनाचे ९० बळी होते. आता पर्यंतचे एका दिवसांतील सर्वाधिक मृत्य़ू २४ जून २०२० मध्ये १२० होते. आकडेवारीच्या अभ्यासानुसार सार्स- कोव्ह-२चा प्रसार झपाट्याने करण्यात रेल्वेच्या लोकल ट्रेनच्या सेवांचा मोठा हातभार लागला आहे. टि आय एफ आरच्या तज्ज्ञांचा निष्कर्ष असे सांगतो की फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळी सर्वांसाठी रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली त्यानंतर कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तनाचा वेग हळूहळू वाढल्याचे दिसुन आले आहे. रेल्वे आणि रस्त्यांवर गर्दीचे प्रमाण वाढले त्यांनंतर या म्युटेशनचा प्रसार झपाट्याने झाला आहे. त्यानंतर दुसरी लाट वेगाने पसरली असावी असे या आकडेतज्ज्ञांचे मत आहे. या अहवालाच्या निष्कर्षानुसार आर्थिक कारणासाठी व्यवहार सुरळीत होत असतानाच गर्दीचे नियोजन योग्य त-हेने न झाल्याने विषाणूची वहन आणि उत्परिवर्तन होण्याची क्रिया वाढत गेली.

  गर्दीच्या संपर्कात फैलावाचे प्रमाण सर्वाधिक
  या तज्ज्ञांचा महत्वाचा निष्कर्ष असा आहे की, कोविड-१९ बाबत आवश्यक गांभिर्य नागरीकांनी पाळले नाही. त्यामुळेच दुस-या लाटेचा धोका जीवघेणा ठरला आहे, त्यातच सरकारनेही ढिलाई नही म्हणत असताना लसीकरणाचा वेग आवश्यक तितका वाढवला नाही त्यामुळे विषाणूचा प्रसार ज्या प्रमाणात झाला त्या प्रमाणात लोकांचे लसीकरण झाले नाही. मार्च महिन्याच्या मध्यात कोरोना विषाणूची मारक क्षमता २.५ पट जास्त होती. त्यामुळे गर्दीत त्याचा प्रसार वेगाने झाला. मुंबईत मोठ्या प्रमाणात मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच पुणे, ठाणे, नाशिक नागपूर या मुंबईतील गर्दीशी सर्वाधिक संपर्कात असलेल्या भागातही हे विषाणू फैलाव होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. या अनुभवातून आता पुढच्या काळात काय खबरदारी घेता येईल याची शिफारस या अभ्यासातून येत्या काही दिवसांत समोर येणार आहे असे या सूत्रांनी सांगितले.