parambir singh and anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयने दाखल केलेल्या गुन्हा, आणि भविष्यात होणा-या कारवाई बाबत गृह विभागाच्या माहितगार सूत्रांनी धक्कादायक माहिती दिली आहे. देशमुख यांच्या विरोधात माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यानी आरोप केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या ताब्यात असलेल्या सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझेचा जबाब महत्वाचा ठरला आहे.

    मुंबई  : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयने दाखल केलेल्या गुन्हा, आणि भविष्यात होणा-या कारवाई बाबत गृह विभागाच्या माहितगार सूत्रांनी धक्कादायक माहिती दिली आहे. देशमुख यांच्या विरोधात माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यानी आरोप केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या ताब्यात असलेल्या सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझेचा जबाब महत्वाचा ठरला आहे.

    गुन्हा २१ एप्रिल रोजीच दाखल

    वाझे याला सेवेत पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय अनिल देशमुख यांच्या कार्यकाळात झाला होता, त्याच प्रमाणे वाझे याला मुंबईतून शंभर कोटी रूपयांच्या खंडणी वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते असे आरोप सिंग यानी केले होते. त्या आधारावरच सीबीआयच्या तपासाला दिशा मिळाली असून सीबीआयने दाखल केलेला गुन्हा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ (लोकसेवकांकडून लाचेची मागणी) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२० ब (कट कारस्थान रचणे) या कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा गुन्हा २१ एप्रिल रोजीच जेंव्हा सीबीआयच्या हाती पुरेसे पुरावे मिळाल्याचे दिसून आले तेंव्हाच दाखल करण्यात आला होता. मात्र पुढील कारवाई करण्यासाठी सीबी आयच्या छापामारी करणा-या दस्त्यांतील सदस्यांच्या कोरोना चाचण्या करून त्यांचे अहवाल निगेटीव्ह येण्याची वाट पहाण्यात गेला. असे या सूत्रांनी सांगितले.

    सचिन वाझेंकडून सिंग यांचे समर्थन

    २० मार्च ला माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात ५ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने प्राथमिक तपास करून तथ्य असल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयचा तपास सुरू झाल्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांचा देखील जबाब एनआयए कस्टडीत जावून सीबी आयकडून नोंदविण्यात आला होता. त्यात बाझे यांने देशमुख यांनी शंभर कोटी जमविण्याबाबत सांगितल्याच्या आरोपांची पुष्टी केली होती, अशी माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे. त्यातील ४०-५० कोटी रूपये १७५० बार आणि रेस्टोरेंट यांच्या मार्फत जमा करण्यास सांगण्यात आले होते अशी माहिती त्यांने दिली असे या सूत्रांचे मत आहे. या मागणीची चर्चा झाली त्यावेळी तेथे देशमुख यांचे स्विय़ सहायक कुंदन शिंदे हजर होते असेही वाझे यांने जबाबात नमूद केल्याचे या सूत्रांनी सांगितले. वाझे यांच्या कडून एनआयए न्यायालयात देखील तश्या आशयाचे पत्र देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र न्यायालयाने ते पत्र दाखल करून घेतले नाही असे यां सूत्रांनी सांगितले. या पत्रात वाझे यांच्या कडून परिवहमंत्री अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता, तर सेवेत परत रूजू करून घेतल्याबद्दल अनिल देशमुख यांनी दोन कोटी रूपये मागितल्याचा उल्लेख करण्यात आला होता.

    बार मालकाच्या जबाबात कबूली?

    याच काळात सीबी आयने देशमुख, त्यांचे स्विय सहायक संजीव पलांडे, कुंदन शिंदे यांचे जबाब घेण्यात आले, त्याशिवाय परमबीर सिंग आणि त्यानी उल्लेख केलेल्या पोलीस अधिकारी संजय पाटील तसेच राजू भुजबळ यांचेही जबाब नोंदविण्यात आले होते. या शिवाय न्यायालयातील मुख्य तक्रारदार ऍड जयश्री पाटील यांच्याकडूनही जबाब आणि पुराव्यासह साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या. सूत्रांनी सांगितले की बार मालक महेश शेट्टी याने जबाबात वाझे याला पैसे दिल्याची कबूली दिली आहे. त्यामुळे या आरोपांत सकृतदर्शनी तथ्य आढळून आल्याचा निष्कर्षाला सीबीआय आली असावी आणि त्यानी अधिक तपास करण्यासाठी गुन्हा नोंदवून घेतला असून छापेमारी करत पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणात सीबीआय कडून देशमुख आणि त्यांच्या संबंधीत अधिका-यांना ताब्यात घेवून चौकशी केली जावू शकते असेही या सूत्रांनी सांगितले.