chandrakant patil

सरकारची पूर्वतयारी नसल्याने मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहिली असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ही ठाकरे सरकारची नाचक्कीच आहे अशा कठोर शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायलयाने तूर्तास नकार दिला आहे. तसेच आगामी वर्षातील जानेवारी महिन्यात पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सरकारची पूर्वतयारी नसल्याने मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहिली असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ही ठाकरे सरकारची नाचक्कीच आहे अशा कठोर शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

न्यायालयात आज  पुन्हा-पुन्हा तेच तेच मुद्दे मांडले गेले. मुकुल रोहतगी यांनी न्यायालयापुढे आज कोणतेही नवे मुद्दे मांडले नाहीत असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

जेव्हा पुनर्विचार याचिका दाखल केली जाते तेव्हा नवे मुद्दे मांडायचे असतात. मागच्या वेळी जे मुद्दे मांडले तेच आज पुन्हा मांडले गेले म्हणूनच यावरची स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आता जानेवारीत सुनावणी होणार असल्याने मराठा समाजापुढे मोठा अंधार निर्माण झाला असे म्हणत पाटील आपला संताप व्यक्त केला.