…तर मुंबईत लॉकडाऊन शिवाय दुसरा ऑप्शन नाही; पालकमंत्री अस्लम शेख यांचे मोठ वक्तव्य

मागील काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra ) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनचा निर्णय जनतेवर सोपवत मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. असे असताना नागरीकांची बेफिकीरी दिसत असून, खबरदारीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काळजी वक्त केली आहे. परिस्थिती बिघडली तरमुंबईत लॉकडाऊन शिवाय दुसरा ऑप्शन नाही असे संकेत अस्लम शेख यांनी दिले आहेत.

    मुंबई : मागील काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra ) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनचा निर्णय जनतेवर सोपवत मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. असे असताना नागरीकांची बेफिकीरी दिसत असून, खबरदारीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काळजी वक्त केली आहे. परिस्थिती बिघडली तरमुंबईत लॉकडाऊन शिवाय दुसरा ऑप्शन नाही असे संकेत अस्लम शेख यांनी दिले आहेत.

    कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी ही चिंतेची बाब आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी मुंबईत एका बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईकरांना परत लॉकडाउन बघायचा नसेल, तर त्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे. परिस्थिती बिघडल्यास लॉकडाऊन करावा लागेल असे संकेत त्यांनी दिलेत.

    अमरावतीमध्ये लॉकडाउन करण्यात आले. काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लावली गेली आहे. त्याच पर्श्वभूमीवर रुग्ण वाढले तर लॉकडाउन होऊ शकतो असा इशारा त्यांनी दिला.

    लोकल बंद होऊ नयेत, तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आवाहन करून लोक ऐकत नसतील तर कारवाई होईल. हॉटेल, नाइट क्लबवर कारवाई सुरू आहे. लॉकडाउन नको असेल तर मुंबईकरांनी जबाबदारीने वागले पाहिजे. लॉकडाउन लावण्याची वेळ येऊ नये यासाठीच हा प्रयत्न आहे, असे अस्लम शेख यांनी सांगितले.