VIDEO : मग मोठमोठ्या हल्ल्यांत एनआयएने काय तपास केला? हे न उमगलेले कोडे; वाझेंचा एवढा बचाव कशासाठी? राम कदम यांचा सवाल

जिलेटिनच्या कांड्यांचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला व पुलवामा हल्ल्यात कायतपास केला, कोणते सत्यशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली हेसुद्धा रहस्यच आहे. पण मुंबईतील वीस जिलेटिन कांडय़ा हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे.

  मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. मग ते गुन्हेगार आहेत असं होत नाही. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २० जिलेटीनच्या कांड्या सापडल्या पण, त्यांचा स्फोट झालाच नाही मात्र याची झळ मुंबई पोलीस दलाला बसली. ‘‘पोलिसांकडून आधी ज्या चुका घडल्या आहेत त्या पुन्हा होणार नाहीत. पोलिसांची प्रतिष्ठा सांभाळली जाईल.’’ असे विधान नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले. नगराळे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे आहे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

  गाडीमालक मनसुख हिरेन याचा संशयास्पदरित्या आढळलेला मृतदेह हा प्रकार नक्कीच चिंताजनक आहे. विरोधी पक्षाने याबाबत काही प्रश्नही उपस्थित केले खरे,पण राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच ‘एनआयए’ने घाईगडबडीत तपासाची सूत्रे हातीघेतली. महाराष्ट्र सरकारला कुठे बदनाम करता आले तर पाहावे यापेक्षा वेगळा ‘उदात्त’ हेतू त्यामागे नसावा. गुन्हे शाखेतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या भोवतीच हे प्रकरण फिरत आहे व त्यामागचा हेतू लवकरच समोर येईल.

  कोणत्याही परिस्थितीत यामागे दहशतवादाच्या तारा जुळलेल्या नसताना या गुन्ह्याच्या तपासासाठी‘एनआयए’ने घुसावे हा काय प्रकार आहे? दहशतवादासंदर्भातीलप्रकरणाचा तपास ‘एनआयए’ करीत असते; पण या जिलेटिनच्या कांड्यांचा तपास करणाऱ्या ‘एनआयए’ने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला व पुलवामा हल्ल्यात कायतपास केला, कोणते सत्यशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली हेसुद्धा रहस्यच आहे. पण मुंबईतील वीस जिलेटिन कांड्या हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे. या सर्व प्रकरणातील घडामोडींचे श्रेय राज्यातील विरोधी पक्ष घेत आहे.विरोधी पक्षाने महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचे स्वप्न बाळगले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण हे असे उपद्व्याप केल्याने त्यांना पुन्हा सत्तेच्या खुर्च्या मिळतील हा भ्रम आहे.

  पोलिसांसारख्या संस्था राज्याचा कणा असतात. त्याची प्रतिष्ठा सगळय़ांनीच सांभाळायची असते. विरोधी पक्ष महाराष्ट्राशी इमान राखून असेल तर ते पोलिसांची प्रतिष्ठा पणास लावून राजकारण करणार नाहीत. मनसुख प्रकरणामागचे पॉलिटिकल बॉस कोण, हा त्यांचा प्रश्न आहे. याचे उत्तर त्यांनीच शोधावे. पण अशा प्रकरणात कोणीच पॉलिटिकल बॉस नसतो. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. मनसुखची हत्या झाली असेल तर गुन्हेगार सुटणार नाहीत. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या. त्या कांडय़ांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल.

  राम कदम यांनी केली टीका

  आजच्या सामनाच्या अग्रलेखात पुन्हा एकदा शिवसेना वाझे यांचं समर्थन करत त्यांच्या बचाव करायला निघालेली आहे. पोलीस आयुक्तांची बदली ही रुटीन ट्रान्सफर आहे असं म्हणत आजच्या लेखात सामानाने त्यांचं कौतुक केले आहे. त्याच ठिकाणी त्यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादीचे गृहमंत्री म्हणतात अक्षम्य माफ न करता येणाऱ्या चुका झाल्या आहेत म्हणून ही बदली केली आहे. अनिल देशमुखांना हा टोला शिवसेनेच्या अक्षम्य चुका झाल्यात असं त्यांना म्हणायचं आहे की, नेमकं कुणाला म्हणायचं आहे. या दोन पक्षातला संघर्ष, या दोन पक्षातली आपसातली भांडणं यामुळेच महराष्ट्रातली कानून व्यवस्था उद्धवस्त झाली आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचे नेते एवढं वाझेचं समर्थन आणि बचाव का करत आहेत हा आमचा सवाल आहे अशा शब्दात भाजप नेते राम कदम यांनी टीका केली आहे.