सोमय्यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; जाहीर पत्रकार परिषदेत डायरेक्ट घेतले शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचे नाव

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील. आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील,” अशी स्फोटक प्रतिक्रिया औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    मुंबई :  काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा दिला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देशमुख यांनी दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

    अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले आता अनिल परबही जातील. आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी जातील,” अशी स्फोटक प्रतिक्रिया औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    दरम्यान, किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचे नाव घेऊन वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सोमय्या यांनी परब यांचे नाव का घेतले? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. सोमय्या यांच्या आजच्या स्फोटक वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात आगामी काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या मृत्यूनंतर अनेक आरोप केले गेले. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. राठोड यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. विरोध वाढल्यामुळे तेव्हा संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.