‘म्युझिक स्कूल’ ची फी भरण्यासाठी तरुणाने रस्त्यावर केले असे काही की……

यासोबत त्यानं एक संदेशही लिहिलेला आहे. यामध्ये त्यानं लिहिलंय की तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद, हे योगदान माझ्या म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी आहे. दरम्यान, या व्हिडीओला सोशल मिडियावर भरपूर प्रतिसाद मिळत आहे. भरभरुन लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव होत आहे. व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

    मुंबई : सोशल मीडियाच्या (Social Media)वापर अनेक फायदे वेळोवेळी आपल्याला दिसून येतात. सातत्याने माहितीचा , व्हिडीओचा मारा होता असलेल्या या सोशल मीडियावर काही चांगल्या घटनाही घडताना दिसून येतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक घटना माणसांची मने जिंकताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका तरुण रस्त्यावर हातात गिटार घेऊन गाणं गात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


    या व्हिडीओमध्ये १९९० च्या चित्रपट जुर्म मधील ‘जब कोई बात बिगड़ जाये’ हे गाणं गात आहे. तो रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं या गाण्यानं लक्ष वेधत आहे. गाणं गाणाऱ्या तरुणाच्या समोर पुढे एक साइनबोर्ड आहे. त्या बोर्डवर अनेक ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म तसेच मदतीसाठी योगदान देऊ इच्छित असलेल्या प्रत्येकासाठी क्यूआर कोड आहे. यासोबत त्यानं एक संदेशही लिहिलेला आहे. यामध्ये त्यानं लिहिलंय की तुमच्या योगदानाबद्दल धन्यवाद, हे योगदान माझ्या म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी आहे. दरम्यान, या व्हिडीओला सोशल मिडियावर भरपूर प्रतिसाद मिळत आहे. भरभरुन लाईक्स आणि कमेंटचाही वर्षाव होत आहे. व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
    इतकंच नव्हेतर अभिनेता कुणाल कपूर,(Kunal Kapoor)यांनी ही ‘ तुम्ही जिथे असाल तेथून तुम्ही या अत्यंत प्रतिभावान आणि नाविन्यपूर्ण संगीतकाराला पाठिंबा देऊ शकता. UPI आणि तंत्रज्ञानाची ही ताकद आहे असे ट्विट केले आहे. याशिवाय अभिनेता हृतिक रोशनने ही कुणाल कपूरचे ट्विट शेअर काळे आहे. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी या मुलाचे कौतुकही केले आहे.