Corona Side Effects : खासगी शाळांच्या मनमानी फी वाढीविरोधात लवकरच ठोस निर्णय; राविकाँच्या शिष्टमंडळाने घेतली शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट

रामस्‍वरूप शर्मा यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना ते प्रतिसाद देत होते. तसंच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

  मुंबई : सीबीएसई, आयसीएसई आणि स्टेट बोर्ड अशा तिन्ही शाळांच्या व्यवस्थापनांकडून सध्या अन्यायकारक, बेकायदा फीवाढ लादून पालक आणि विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळवून त्यांना मानसिक तणावाच्या गर्तेत ढकलण्याचे काम सुरू आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नुकतीच राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. या भेटीत अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला वर्षाताई गायकवाड यांनी या प्रश्नी सरकार लवकरच ठोस निर्णय घेईल, असे आश्वासन दिले.

  काही शाळा सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जात असल्याने निर्णयात अडथळे निर्माण होतात. परंतु यापुढे सर्व कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्याचा विचार सरकार करत आहे, असे ठामपणे सांगितले. मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी शाळांच्या मनमानी फीवाढीसह अनेक विषयांवर वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

  खासगी शाळांकडून पालकांवर मनमानी, बेकायदा फीवाढीचे ओझे लादले जात आहे. कोरोना काळात अनेक उद्योग ठप्प आहेत अनेकांना त्यांच्या रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. याकडे लक्ष वेधून घेत ॲड. अमोल मातेले यांनी पालकांची बाजू लावून धरली. तसेच आपल्याला मुंबई आणि आसपासच्या परिसरातून असंख्य पालकांचे फोन आणि संदेश येत आहेत. यामध्ये पालकांचा मुख्य विषय हा खासगी शाळांकडून आभासी नावाखाली लादली जाणारी मनमानी फीवाढ आहे.

  सरकारने या प्रश्नावर योग्य तो जलद निर्णय घ्यावा अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मुंबई विद्यापीठ व्यस्थापनाला ढिसाळ कारभार सुधारण्यासाठी अनेकदा दणके दिले आहेत. जनतेच्या अनेक प्रश्न तडीस नेल्याशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी शांत बसंत नाही, त्यामुळे येत्या काळात इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांच्या मनमानी आणि अन्यायकारक फीवाढ प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास राष्ट्रवादी आपल्या पद्धतीने हे आंदोलन हातात घेईल, असे ॲड. अमोल मातेले यांनी यावेळी सांगितले.


  आभासी (ऑनलाइन) शिक्षणाच्या नावाखाली मोबाइल, टॅब खरेदी करा, तुमच्या मुलांचा अभ्यास त्यांच्याकडून करून घ्या आणि शाळा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ला जी मनमानी फी सांगत आहेत ती मुकाट्याने अवाक्षर ना काढता भरायची असा प्राथमिक-पूर्व प्राथमिक इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांचा व्यापार सुरू आहे. कोरोना काळात अनेकांनी आपला रोजगार गमावला आहे, व्यवसाय ठप्प आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही चोरी करा, दरोडे घाला पण आम्ही जेवढी सांगतो आहोत ती फी मुकाट्याने भरा, असा हुकुमी आदेश काही शाळांनी लागू केला आहे. या प्रश्नी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली.

  भेटीतील महत्वाचे मुद्दे

  • सध्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक स्तरावर वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ साठी ८ मार्च रोजी अचानक खासगी शाळांची फी वाढ करण्यात आली. यामध्ये प्राथमिक शाळांच्या फीवाढीचा आकडा हा शैक्षणिक वर्ष २०२१-२२साठी ५९ हजार रुपये मार्चपर्यंत वार्षिक असा गेला आहे.
  • राज्य सरकारमार्फत काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पुढील किंवा या शैक्षणिक वर्षांपर्यंत शाळा सुरु करण्याचे घाट घातला जात होता. परंतु, कोरोना संसर्गाचा फैलाव पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने यंदा तरी शाळा सुरू करणे अद्याप सुरु झाले नाही. परंतु भोजन, सहल, वार्षिक सोहळा, ग्रँड पेरेंट्स डे, स्पोर्ट्स डे, फील्ड ट्रीप आदीच्या नावाखाली आभासी शिक्षणाच्या नावाखाली फीवसुली मोहीम या शाळांनी सुरू केली आहे.
  • हप्त्यावर payment/ installment कशीही भरा पण आमची झोळी भरा असा मनमानी निर्णय या शाळांनी देऊन टाकला आहे.
  • शाळा यावर्षी सुरू होण्याच्या सर्व आशा मावळल्या असताना पुढच्या वर्षीसाठी काय होईलमी याचा नेम नसताना आभासी शिक्षणासाठी मनमानी फी आकारण्यात आली आहे.
  • संगीतवर्ग, प्रयोगशाळा, विज्ञान, कॉम्पुटर, av रूम इंटरनेट सुविधा अशी एक नाही तर अनेक सुविधा पुरवत असल्याचे फी वसुली चार्टमध्ये म्हटले आहे. शाळा सुरू नसताना यंदा फक्त शुल्क आकारून विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली.
  • ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली पालकांना मोबाइल खरेदी, इंटरनेट असा भुर्दंड लावून प्राथमिक-पूर्व प्राथमिक वर्षासाठी ३० हजारापर्यंत संपूर्ण फी आकारण्यात आली. कोरोना काळात प्रत्येकापुढे आर्थिक संकट असताना पालकांच्या खिशावर शाळांनी दरोडा टाकून लूट माजवणे योग्य आहे का, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.
  • या अन्यायकारक फी वाढीतून पालकांना राज्य सरकार दिलासा देईल की, या शाळांवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने पालकांना तोंड दाबून बुक्यांचा मर सहन करावा लागेल. असा प्रश्न निर्माण होत आहे.

  खासगी शाळांनी लादलेल्या मनमानी आणि अन्यायकारक फी वाढीविरोधात आमच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी पालकांना फी वाढीतून दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेऊ, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री या नात्याने त्यांनी दिले. पालकांना न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे.

  ॲड. अमोल मातेले, अध्यक्ष, मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस