चार महिने उलटूनही निर्णय झालाच नाही, विधानसभा अध्यक्षपदासाठी येत्या दोन महिन्यांमध्ये विशेष अधिवेशनाची शक्यता ?

गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या पावसाळी अधिवेशनात(Monsoon Session) रखडलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी(Speaker Selection) सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन(Special Session) घेण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे.

  मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhagatsingh Koshyari) यांनी दिलेल्या निर्देशानंतर पत्राव्दारे उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakre) यांनी या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची(Assembly Speaker) निवड करण्यास आवश्यक वेळ नव्हता, असा खुलासा काल माध्यमांसमोर केला होता. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या पावसाळी अधिवेशनात(Monsoon Session) रखडलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी(Speaker Selection) सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे.

  काँग्रेस पक्षातून नाव निश्चिती नाही
  काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त झाले आहे. त्यानंतर मागील अधिवेशन अध्यक्षाविनाच पार पडले. पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, यासाठी विरोधक आग्रही मागणी करत होते. मात्र कोविड स्थिती असल्याने निर्बंधांच्या छायेत प्रक्रिया पूर्ण करण्याइतका कालावधी नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय काँग्रेस पक्षातून अद्याप नेमके कुणाला या पदावर नेमण्यात यावे याबाबतचा अंतिम निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही, अशी माहिती या सूत्रांनी दिली.

  विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे राखावे
  मात्र आता हिवाळी अधिवेशनापूर्वी सप्टेंबरच्या अखेरच्या  सप्ताहात किंवा ऑक्टोबर महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही असून या पदावर काँग्रेसचा उमेदवार असावा अशी त्यांची मागणी होती. मात्र गेल्या दोन दिवसांत भास्कर जाधव यांनी ज्या प्रकारे भाजपच्या आव्हानांचा सामना केला ते पाहता आणखी एक उपमुख्यमंत्रीपद तयार करून काँग्रेसला द्यावे आणि विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे राखावे अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

  नऊ सदस्य अधिवेशनात गैरहजर
  पावसाळी अधिवेशनाला महाविकास आघाडीचे नऊ आमदार अधिवेशनात गैरहजर होते. त्यामुळेही हा निर्णय टाळण्यात आल्याचे समजते. मात्र विशेष अधिवेशन घेवून येत्या दोन महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.