कोविड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी गुरुवारी विशेष सत्र, ‘या’ दिवशी पहिला डोस दिला जाणार नाही

लसीकरणासाठी मुंबई महानगरात महानगरपालिका व शासकीय रुग्णालये मिळून ३२० तर खासगी रुग्णालयात १३० अशी एकूण ४५० कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण ७१ लाख २४ हजार ८२० लाभार्थ्यांना (७९ टक्के) लसीची पहिली मात्रा तर २८ लाख ५० हजार ५५४ एवढ्या लाभार्थ्यांना (३१ टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

    मुंबई – कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. नागरिकानी कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी लसीचा दुसरा डोस घेणा-या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही, असे पालिकेने जाहिर केले आहे.

    लसीकरणासाठी मुंबई महानगरात महानगरपालिका व शासकीय रुग्णालये मिळून ३२० तर खासगी रुग्णालयात १३० अशी एकूण ४५० कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण ७१ लाख २४ हजार ८२० लाभार्थ्यांना (७९ टक्के) लसीची पहिली मात्रा तर २८ लाख ५० हजार ५५४ एवढ्या लाभार्थ्यांना (३१ टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

    यानुषंगाने, दुसरी मात्रा देय असलेल्या नागरिकांसाठी लस मात्रांच्या उपलब्धतेनुसार विशेष लसीकरण सत्र ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले हेाते. या लसीकरण सत्रास नागरिकांचा उत्‍तम प्रतिसाद मिळाला या दिवशी १ लाख ७९ हजार ९३८ लाभार्थ्‍यांना दुसरी मात्रा देण्‍यात आली. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन गुरुवारी दुसरा डोस घेणा-या लाभार्थ्‍यांसाठी पुन्हा एकदा विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.