Special train from Dadar to Sawantwadi Road
दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन

मुंबई: मध्य रेल्वे दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे. या विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील. मान्सून / नॉन-मॉन्सूनच्या वेळेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

मान्सूनच्या वेळा
१) दादर-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन

०१००३ विशेष गाडी दादरहून दररोज ००.०५ वाजता दिनांक २६.९.२०२० ते ३१.१०.२०२० पर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १२.२० वाजता पोहोचेल.

०१००४ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज १७.३० वाजता दिनांक २६.९.२०२० ते ३१.१०.२०२० दरम्यान सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दादरला ०६.४५ वाजता पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण , सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

नॉन-मॉन्सूनच्या वेळा

२) दादर-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन

०१००३ विशेष गाडी दादरहून दररोज ००.०५ वाजता दिनांक ०१.११.२०२० पासून ते पुढील सूचना मिळेपर्यंत सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १०.४० वाजता पोहोचेल.

०१००४ विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज १८.५० वाजता दिनांक ०१.११.२०२० पासून ते पुढील सूचना मिळेपर्यंत सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दादरला ०६.४५ वाजता पोहोचेल.

थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण , सावर्डा , अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.