मलेरिया, डेंग्यूच्या नियंत्रणासाठी कार्यवाही गतीने करा; महापौर पेडणेकर यांचे आवाहन

धूर फवारणीसाठी डिझेलचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे निर्दशनास आले आहे. याबाबत संबंधित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश पेडणेकर यांनी यावेळी दिले.

    मुंबई (Mumbai) : मलेरिया व डेंग्यूची (malaria and dengue) सद्यस्थिती नियंत्रणात असली तरी आगामी सणासुदीच्या काळात प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून धूर फवारणी (the spraying of smoke) तसेच रुग्ण निदान व उपचार अधिक गतीने करण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी प्रशासनाला दिले.

    मलेरिया व डेंग्यूच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे भायखळा येथील महापौर निवासस्थानी आढावा बैठक घेतली. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या. बैठकीला उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर उपस्थित होते.

    ठिकाणी धूर फवारणीसाठी डिझेलचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे निर्दशनास आले आहे. याबाबत संबंधित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश पेडणेकर यांनी यावेळी दिले. डेंग्यू, मलेरियाची रुग्णसंख्या वाढणार नाही. याबाबत अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. काही विभाग कार्यालयांनी डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी ड्रोन घेतले असून त्याचा अधिक वापर करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

    डास उत्पत्ती करणारी ठिकाणे व बांधकामाची ठिकाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गणेशोत्सवामध्ये आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देशही दिले. दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता यादृष्टीने योग्य उपाययोजना करून मुंबईकरांना अधिक सुरक्षित कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे महापौरांनी निर्देश दिले.