स्पाइस मनीने भारतातील सर्वात शेवटचे गाव, हिमाचल प्रदेशातील चितकुलमध्ये सुरु केली पहिली एटीएम सेवा

शहरी वर्दळीपासून दूर, निवांत हिमाचल प्रदेशातील किन्नौर-कैलास परिसरात वसले आहे एक अतिशय सुरम्य गाव चितकुल, येथील लोकसंख्या जवळपास ९०० असून गावात २०-२५ हॉलिडे रिसॉर्ट्स आहेत, जिथे या गावात येणाऱ्या पर्यटकांचा पाहुणचार केला जातो. चितकुलपासून सर्वात जवळ असलेले एटीएम तब्बल २५ किमी दूर असलेल्या सांगलामध्ये आहे, इंटरनेट कनेक्टिविटी खराब असल्या कारणाने ई-बँकिंग सेवा उपलब्ध होऊ शकत नाहीत.

  • रोख रक्कम सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी मिनी-एटीएम सेवेसह सुरु केले स्पाइस मनी डिजिटल दुकान
  • भारतातील सर्वात दूरवरच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या भागांना आर्थिक प्रणालीमध्ये सामावून घेण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने उचलले आणखी एक पाऊल

मुंबई : भारतातील आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी स्पाइस मनीने भारतातील सर्वात शेवटचे गाव, हिमाचल प्रदेशातील चितकुलमध्ये आर्थिक सेवा सुरु केल्या आहेत. या गावात आजवर एटीएम सुविधा नव्हती, आज त्याठिकाणी स्पाइस मनीने मिनी-एटीएम सेवा सुरु केल्या आहेत. चितकुल गावात फक्त दोन किराणा दुकाने आहेत, त्यापैकी एकाला कंपनीने स्पाइस मनी ‘डिजिटल दुकान’ बनवले आहे. गावकरी आणि याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या स्पाइस मनी डिजिटल दुकानात कॅश-इन कॅश-आऊट सेवा मिळतील. आर्थिक समावेश आणि भारतात एटीएम नेटवर्क अधिक सक्षम बनवण्याचे स्पाइस मनीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे, ज्यामध्ये गेल्या काही वर्षात आश्चर्यजनक विकास झाला आहे.

शहरी वर्दळीपासून दूर, निवांत हिमाचल प्रदेशातील किन्नौर-कैलास परिसरात वसले आहे एक अतिशय सुरम्य गाव चितकुल, येथील लोकसंख्या जवळपास ९०० असून गावात २०-२५ हॉलिडे रिसॉर्ट्स आहेत, जिथे या गावात येणाऱ्या पर्यटकांचा पाहुणचार केला जातो. चितकुलपासून सर्वात जवळ असलेले एटीएम तब्बल २५ किमी दूर असलेल्या सांगलामध्ये आहे, इंटरनेट कनेक्टिविटी खराब असल्या कारणाने ई-बँकिंग सेवा उपलब्ध होऊ शकत नाहीत.

साहजिकच हे गाव गेली अनेक वर्षे रोख रक्कम आणि अदायगी सेवांच्या उपलब्धतेच्या बाबतीत अनेक आव्हाने झेलत आहे, यामुळे बऱ्याच समस्या उभ्या राहतात आणि गावाच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होत आला आहे. स्पाइस मनीने आपल्या डिजिटली सक्षम आर्थिक सेवांसह या समस्येवर तोडगा शोधून काढला, त्यांनी येथील किराणा दुकानाच्या मालकाला स्पाइस मनी अधिकारी बनवून, कोणताही खर्च होऊ न देता त्यांना डिजिटल दुकान सुरु करून दिले आहे. आता हे डिजिटल दुकान रोख रक्कम काढणे व जमा करणे या पायाभूत सेवा प्रदान करणारे एटीएम केंद्र म्हणून कार्यरत आहे. स्पाइस मनी मिनी-एटीएममध्ये सर्व प्रमुख बँकांची डेबिट व क्रेडिट कार्ड्स स्वीकारली जातात.

स्पाइस मनीचे सीईओ संजीव कुमार यांनी सांगितले, “ग्रामीण भारतात रोख अर्थव्यवस्थेवर भर असतो परंतु एटीएम आणि मूलभूत बँकिंग सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे गावांमध्ये रोख रकमेची खूप कमतरता भासते. स्पाइस मनीमध्ये आमचे उद्दिष्ट आहे की, भारताच्या दूरवरील कानाकोपऱ्यांमधील सर्वात छोट्या गावांना आणि शहरांना सक्षम बनवले जावे आणि त्याठिकाणी एटीएम सेवा सुरु केल्या जाव्यात. चितकुलमध्ये मिनी-एटीएम सेवा सुरु करून आम्ही देशात एटीएम पायाभूत सेवा अधिक चांगल्या बनवण्याच्या दिशेने पुढचे पाऊल उचलले आहे. अशा प्रकारे आम्ही भारतात सर्वात मोठे एटीएम नेटवर्क निर्माण करण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने पुढे जात आहोत. चितकुलच्या गावकऱ्यांना आणि याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना रोख रक्कम मिळवण्यासाठी अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. आम्हाला पक्की खात्री आहे की, स्पाइस मनीने सुरु केलेल्या पहिल्या डिजिटल दुकानामुळे त्यांची ही समस्या कायमची दूर होईल.”

मिनी एटीएम सेवा, अदायगी, पर्यटन व प्रवास सेवा प्रदान करण्यासाठी अधिक जास्त वितरकांना सोबत घेऊन हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये स्पाइस मनी अधिकारी नेटवर्कच्या विस्ताराची योजना कंपनीने आखलेली आहे. सध्या ५,००,००० पेक्षा जास्त अधिकारी (व्यापारी/व्यावसायिक) स्पाइस मनी नेटवर्कमध्ये सहभागी असून त्यांच्यापैकी जवळपास ९०% हे निम-शहरी व ग्रामीण भारतात आहेत. या नेटवर्कसोबत स्पाइस मनी भारतात १८,००० पेक्षा जास्त पिन कोड्स, ७०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आणि ५,००० पेक्षा जास्त ब्लॉक्सना सेवा प्रदान करत आहे.

अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा.

Spice Money launched its first ATM service in Chitkul Himachal Pradesh the last village in India