राज्यात रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; राज्यात ५० हजार तर मुंबईत ९ हजार युनिट रक्तसाठा, ‘हा’ नियम ठरतोय अडसर, वाचा सविस्तर

सध्या राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी दिली. सध्या राज्यात ५० हजार तर मुंबईत ९ हजार युनिट रक्तसाठा असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. कोरोनामुळे रक्त पुरवठ्याकडे लक्ष दिले जात आहे. रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्त साठा उपलब्ध असावा यासाठी रक्तदान शिबिरांचे सतत आवाहन करण्यात येत आहे.

    मुंबई : लसीकरण केल्यानंतर दोन महिने तरी रक्तदान करू शकत नाही, अशा सूचना राज्य सरकरकडून दिल्या गेल्या. ज्यामुळे लस घेण्याआधी रक्तदान करा असे राज्य सरकारकडून सांगण्यात आल्या.

    रक्तदानासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अलिकडेच आवाहन केले होते. त्यानंतर, राज्यासह मुंबईतील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे भरवण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढचे २० ते २५ दिवस रक्ताचा तुटवडा जाणवनार नाही असे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

    सध्या राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी दिली. सध्या राज्यात ५० हजार तर मुंबईत ९ हजार युनिट रक्तसाठा असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. कोरोनामुळे रक्त पुरवठ्याकडे लक्ष दिले जात आहे. रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्त साठा उपलब्ध असावा यासाठी रक्तदान शिबिरांचे सतत आवाहन करण्यात येत आहे.

    गेल्या वर्षी महामारीत रक्तदानासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले होते, त्या प्रमाणे यंदाही रक्तदानासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी आवाहन केले असल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. सध्या रक्तसाठ्याची स्थिती चांगली असून राज्यात ४८ ते ५० हजार युनिट रक्तसाठा आहे. तर मुंबईत ९ हजार रक्तसाठा आहे.

    दरम्यान, बहुतांश ठिकाणी रक्तदानाचे शिबीर भरविण्यात आले. त्यानुसार, गरजेपुरते साठा असल्याचे त्या त्या रक्तपेढयांकडून सांगण्यात आले आहे. मात्र हा रक्त साठा पुढचे २० -२५ दिवस पुरेल एवढा असल्याचे डॉ. थोरात म्हणाले.