Spoon dug tunnel; Six prisoners escape from what is considered to be the safest prison in the world

बोगदा खोदून अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहातून 6 कैदी पळून गेल्याची घटना इस्राएलमधील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहात घडली. हे सर्व कैदी दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात होते. इस्राएलमधील गिलबोआ तुरुंगात ही घटना घडली. हे सर्व कैदी एकाच कोठडीत होते आणि त्यापैकी पाच जण इस्लामिक जिहाद संघटनेशी संबंधित असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. तर एक आरोपी त्यांच्याशी संलग्न असलेल्या सशस्त्र गटाचा माजी कमांडर होता.

  जेरूसलेम : बोगदा खोदून अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहातून 6 कैदी पळून गेल्याची घटना इस्राएलमधील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहात घडली. हे सर्व कैदी दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात होते. इस्राएलमधील गिलबोआ तुरुंगात ही घटना घडली. हे सर्व कैदी एकाच कोठडीत होते आणि त्यापैकी पाच जण इस्लामिक जिहाद संघटनेशी संबंधित असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. तर एक आरोपी त्यांच्याशी संलग्न असलेल्या सशस्त्र गटाचा माजी कमांडर होता.

  मनसुब्यांचा सुगावाच नाही

  कडकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरुंगातून पळ काढण्यासाठी कैद्यांनी बाथरूममध्ये सिंकखाली बोगदा खोदला होता. गंजलेल्या चमच्यांच्या मदतीने त्यांनी गेले कित्येक दिवस बोगदा खोदला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. हे कैदी एकामागून एक येत व बोगदा खोदत असत.यानंतर मात्र हे कैदी सामान्य कैद्यांसारखेच दिसत असत. अतिशय हुशारीने व चलाखीने त्यांनी हे काम केले की कोणालाही त्यांच्या मनसुब्यांचा सुगावाच लागला नाही.

  400 कैदी अन्य तुरुंगात स्थानांतरित

  दरम्यान, कैद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. ते आता जवळच्याच इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक प्रदेशात पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली असून रस्ते बंद करण्यात आले आहेत आणि मोठ्या संख्येने पोलिस दल त्यांचा शोध घेत आहेत. याशिवाय 400 कैद्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

  पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख इस्लामिक जिहादने ‘नायक’ असा केला आहे. हा एक मोठा विजय असल्याचे हमासचा प्रवक्ता फावदी बारहौम म्हणाला.