सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार केल्यास रेल्वे प्रवाशांना होऊ शकतो कारावास

सणासुदीच्या (festival ) पार्श्वभूमीवर रेल्वेच्या गर्दीने कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे प्रवाशांसाठी कठोर मार्गदर्शक (Guidelines) तत्त्वे जारी केली आहेत. कोरोनाविषयक मार्गदर्शक नियमाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह (corona positive) असतील किंवा त्याचा अहवाल प्रलंबित असेल त्यांनी प्रवास करू नये यासाठी आधी जनजागृती करण्यात येणार आहे.

प्रवाशांना कोरोनाचा अहवाल प्रलंबित असताना किंवा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे माहीत असूनही हेतुपुरस्सरपणे प्रवास करणे प्रवाशांना प्रचंड महागात पडू शकते. अशा प्रवाशाला इतर प्रवाशांचे जीव धोक्यात घातले म्हणून रेल्वेच्या कायद्यानुसार दंड किंवा कारावास वा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असे रेल्वे सुरक्षा बलाने स्पष्ट केले आहे.

अनलॉक-५ अंतर्गत ९ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातूनही इंटरसिटी गाडय़ांसह १३ गाडय़ांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोरोना साथीत होणारी गर्दी पाहता रेल्वे सुरक्षा बलाने प्रवाशांसाठी कठोर नियमावली जारी केली आहे. मास्क न घालणे किंवा तो नीट न घालणे, ‘सोशल डिस्टन्सिंग’ न पाळणे, कोविड पॉझिटीव्ह असूनही रेल्वे किंवा स्टेशन परिसरात येणे किंवा ट्रेन पकडणे, कोविडची चाचणी देऊन निकाल प्रलंबित असताना प्रवास करणे, किंवा रेल्वे स्थानकात आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकाला असहकार्य करणे, थुंकणे, रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये अस्वच्छता त्याचप्रकारे रेल्वेचे नियम न पाळल्यास रेल्वे अधिनियम १९८९ च्या १४५,१५३ आणि १५४ कलमानुसार कारवाई होणार आहे.