एसटी महामंडळ घेणार मोठा निर्णय, एसटी कर्मचाऱ्यांचे थकित पगार देण्यासाठी २००० कोटींचे कर्ज काढणार

कोरोना काळात एसटी वाहतूक ठप्प असल्याने २२ कोटींचा तोटा झाला आहे. यामुळे अनेक तोटे महामंडळाला बसले आहेत. उत्पन्नाची साधने कोरोनामुळे वाढण्याएवजी उत्पन्नच बंद झाल्यामुळे हा तोटा वाढला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार थकले आहेत. दिवाळी सारखा सण आल्यामुळे कामगारांना पगार मिळणे अवश्यक आहे.

मुंबई : राज्यात कोरोना (Corona Virus) काळात लॉकडाऊन (Lockdown) केल्यावर एसटी वाहतूकही ठप्प होती. कोरोना संकटामुळे एसटी (S.T) कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकार थकले आहे. यामध्येच आता सणासुदीचे दिवसांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांवर दिवाळी आली आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाला इंधन खर्च आणि इतर गोष्टीच्या खर्चासाठी पैसा लागणाल आहे. त्यामुळे एसटी महामंडळ २००० कोटींचे कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच याबाब. राज्य सरकारकडे ३६०० कोटींचा प्रस्तावही मांडला असल्याची माहिती त्यांन दिली आहे.

कोरोना काळात एसटी वाहतूक ठप्प असल्याने २२ कोटींचा तोटा झाला आहे. यामुळे अनेक तोटे महामंडळाला बसले आहेत. उत्पन्नाची साधने कोरोनामुळे वाढण्याएवजी उत्पन्नच बंद झाल्यामुळे हा तोटा वाढला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार थकले आहेत. दिवाळी सारखा सण आल्यामुळे कामगारांना पगार मिळणे अवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारकडे ३६०० कोटींचा प्रस्ताव मांडला आहे. कोरोनामुळे मोठा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील तिजोरिवर ताण पडला आहे. त्यामुळे महामंडळाने २००० कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.